कल्याण :-
विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना शिंदेचीच असा निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय . एकीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी संघर्ष सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर देखील दावा करण्यात आलाय .समता पार्टीने मशाल चिन्हाबाबत पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय .निवडणूक आयोगाच्या नवीन नोटिफिकेशननुसार निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या कागदपत्रांची पूर्तता केल्याची माहिती समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी दिलीय . निवडणूक आयोगाच्या नवीन नोटिफिकेशन नुसार निवडणूक आयोगाकडे पक्षा संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता केली असून मशाल चिन्ह आम्हाला मिळावे यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले . तसेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं . यावेळी निवडणूक आयोगाने दाद न दिल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे मंडल यांनी सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना मंडल यांनी उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तात्पुरता स्वरूपात देण्यात आले होते मात्र त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या मेहरबानीमुळे त्यांना हे चिन्ह पुढे देखील मिळाले मात्र मशाल हे चिन्ह समता पार्टीचे आहे मशाल समता पार्टीची ओळख आहे असे सांगितले . उद्धव ठाकरे भाड्याची मशाल वापरत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला . समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्यामुळे हे मशाल हे चिन्ह आम्हालाच मिळेल,लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंचे मशाल चिन्ह त्यांच्याकडून जाणार आहे आणि ते समता पार्टीकडे येणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुढे बोलताना येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मशाल चिन्हावर उमेदवार उतरणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले