कल्याणमध्ये शिवसेना भाजपमधील वाद संपेना

Uncategorized

स्वत:चे घर कसे भरेल, शाळा, प्रॉपर्टी बळकाविणे हेच काही लोकप्रतिनिधींचे काम

नाव न घेता भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर शिवसेना पदाधिकाऱ्याची घनाघाती टिका

काही लोकप्रतिनिधींचे असे आहे . स्वत:चे घर कसे भरेल. हा त्यांचा प्रयास असतो. स्वत:चे बॅनर असू द्या एखाद्या शाळा, प्रॉपर्टी बळकाविण्याचे असू द्या. कल्याणमधील जनता सूज्ञ आहे आणि समजदार लोक आहे. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिला आहे. त्या लोकांच्या अडचणी आणि समस्या सोडविण्याची गरज आहे. हे काम त्यांनी करावे अशी घणाघाती टिका शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांचावर नाव न घेता केली आहे. त्यांच्या टिकेमुळे कल्याणमधील शिवसेना भाजप मधील वाद संपणार नाही हे दिसून येत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कल्याणमध्ये येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. मात्र कल्याणमध्ये शिवसेना भाजप वाद संपेना. दोन दिवसापूर्वी महापालिकेने भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे बॅनर काढले. अधिकाऱ्यांनी बॅनर काढल्यानंतर भर रस्त्यात महापालिकेतील अधिकाऱ्यांना गाठून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला होता. माझ्या बॅनर वर कारवाई केली. मात्र माझ्या तक्रारीवर कारवाई केली जात नाही असे का असा सवाल विचारला होता. अदृश्य शक्तीच्या सांगण्यावरुन माझे बॅनर काढले गेले असा आरोप गायकवाड यांनी केला होता. शिवसेना नेत्याचे नाव न घेता आरोप केला होता. त्याला शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी प्रतिउत्तर देत आमदार गणपत गायकवाड यांचे न घेता पलटवार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *