कल्याण
मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभा सभागृहात मंजूर करण्यात आल्यानंतर मराठा समाजात आनंदाचे उत्साहाचं वातावरण आहे .कल्याण मध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला . कल्याण पूर्व काटेमानवली नाका येथे ढोल वाजून, फुगड्या घालत, नाचत ,जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल कार्यकर्ते व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला . गेली कित्येक वर्ष मराठा आरक्षणासाठी संघर्ष करण्यात येतोय. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आरक्षण मिळाल्याबद्दल शिवसेना कार्यकर्ते व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले