ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांचं व्यंगचित्र असलेला उपरोधिक बॅनर कल्याण मध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहे
डोंबिवली :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय ,यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळ हरदास यांनी राज ठाकरे यांचे व्यंगचित्र काढलेला उपरोधिक बॅन कल्याण पश्चिमितील अहिल्याबाई चौकात तसेच इतर ठिकाणी चौकात लावलाय . या बॅनरवर राज ठाकरे यांचे कार्टून काढण्यात आले आहे. पायात पॅड दुसऱ्या हातात बॉल देण्यात आलाय .आयपीएल मध्ये जसा impact प्लेयर असतो ,तसाच हा बॅनर खाली उपरोधिकपणे इम्पॅक्ट प्लेयर असे लिहले आहे . हा बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरलाय. या बॅनरमुळे आता राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल ..