कल्याण-
आधी कुठेही जाण्याकरीता ओला बूक करायचा. त्या ओला गाडीत फिरायचा. तीच गाडी एका निर्जनस्थळी न्यायचा. ओला चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याला लूटन पसार व्हायचा. भरत थळे या लूटारुला कल्याणच्या महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत.
कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात काही दिवसापासून एक अजबच लूटीची घटना घडत होती. कोणीतरी व्यक्ती ओला गाडी बूक करायचा. ती आेला गाडी घेऊन चालक पुढे जायचा. नंतर त्याला चालकाला आेला बूक करणारा व्यक्ती लूटायचा. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांकडे अशा प्रकारची तक्रार आली होती. डीपीसी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांना त्या आरोपीला पकडण्यात यश आले आहे. भरत थळे असे या व्यक्तिचे नाव आहे. भरत हा भिवंडी तालुक्यातील लोणार गावात राहणारा आहे. भरत हा काही कामानिमित्त वलीपूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसानी सापळा रचून भरतला अटक केली आहे. भरतने अशा प्रकारे काही गुन्हे केले आहेत का ? या अंगानेही पोलिस तपास करीत आहेत.