कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभागाची अंतिम रचना नुकतीच प्रसिद्ध झाल्यानंतर आत्ता महिला आरक्षणाची सोडत 31 मे रोजी होणार आहे. त्याचा कार्यक्रम 27 मे रोजी उघड केला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक अधिका:यांनी दिली आहे.
मागील निवडणूकीच्या वेळी एक सदस्यीय पद्धत होती. त्यावेळी महापालिका हद्दीत 27 गावे मिळून 122 प्रभाग होते. त्यावेळी ओबीसी आरक्षण अबाधित होते. तसेच महिलांचे आरक्षण ही होते. त्यावेळी 122 पैकी 68 प्रभागातून महिला निवडून आल्या होत्या. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट आहे. ओबीसी आरक्षण वगळता महापालिकेची त्रिसदस्य पद्धतीने निवडणूक होणार आहे. 133 प्रभागाकरीता 44 प्रभाग आहेत. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या 13 प्रभागांपैकी 4 महिलांसाठी तर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या चार प्रभागापैकी 2 प्रभाग हे महिलांसाठी आक्षित आहेत. अनुसूचित जाती जमातीचे हे 17 प्रभाग सोडल्यास उर्वरीत 116 प्रभागांपैकी 58 प्रभाग हे सर्व साधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. त्यासाठी आरक्षणाची सोडत 31 मे रोजी होईल. त्याची वेळ आणि स्थळ 27 मे रोजी जाहिर केले जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी सुधाकार जगताप यांनी दिली आहे.
कसा असेल पुढचा कार्यक्रम
३१ मे रोजी महिला आरक्षणाची सोडत
१ जून रोजी महिला आरक्षित प्रभागाचे प्रारुप प्रसिद्ध करणे
१ ते ६ जून दरम्यान महिला आरक्षण सोडतीवर सूचना व हरकती मागविण्यात येतील.