अधिकारी कर्मचाऱ्यांची “दिवाळी” केडीएमसीबाहेर
Kalyan : कल्याण डोंबिवली पालिकेतील कर्मचारी, अधिकाऱी यांनी पालिकेत स्वतः किंवा आपले कुटुंबीय, खासगी व्यक्तींच्या माध्यमांमधून दिवाळी भेटीचा स्वीकार करू नये, असे परीपत्रक आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी मंगळवारी काढले..हे परिपत्रक पालिका मुख्याध्यापक कार्यालयांमध्ये देखील लावण्यात आला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे दिवाळीच्या काळात आपल्या खासगी वाहनांच्या डिकी, वाहन दिवाळी भेट वस्तुंनी भरुन घेऊन जाणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पालिकेच्या २५ वर्षात प्रथमच अशाप्रकारचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना आपली दिवाळी केडीएमसी बाहेरच स्वीकारावी लागणार आहे …