तर पगार पण लिमिटेड घ्या
व्हिडियो व्हायरल
दिवाळीचा पार्श्वभूमीवर केडीएमसी ऑन ड्युटी 24 तास
Dombivali : फिल्ड ऑफिसर म्हणून तुम्हाला तुमची जबाबदारी कळत नाही का?…. ड्रेनेची काय व्यवस्था आहे.. रस्त्यावर काय काम केलं पाहिजे ….जो ठेकेदार काम करत नाही एवढेच बोलून फक्त थांबायचं… एक लक्षात ठेवा जेवढे जमत तेवढे काम करत असाल तर पगार पण लिमिटेड घ्या ..असे खडेबोल केडीएममी शहर अभियंता अर्जुन आहिरे यांनी फोन करून संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले .दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खड्डे मुक्त रस्ते , शहरात स्वच्छता राहावी यासाठी आजपासून महापालिका अधिकारी आज पासून २४ तास ऑन ड्युटी राहनार आहेत. या कामाचा शुभारंभ डोंबिवली पूर्वेकडील ब्राह्मण सभा हॉल परिसरात करण्यात आला.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खड्डे मुक्त रस्ते , शहरात स्वच्छता राहावी यासाठी आजपासून महापालिका अधिकारी आज पासून २४ तास ऑन ड्युटी राहनार आहेत. या कामाचा शुभारंभ डोंबिवली पूर्वेकडील ब्राह्मण सभा हॉल परिसरात करण्यात आला. आजपासून 23 तारखेपर्यंत महापालिकेची ही मोहीम सुरू राहणार असल्याचे यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सांगितलं.. या कामाची माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी यावेळी पाहणी केली .. दिवाळीपूर्वी नागरिकांना चांगले रस्ते व स्वच्छ शहर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार महापालिकेने आज पासून हा उपक्रम हाती घेतलाय… हे काम 23 तारखेपर्यंत 24 तास सुरू राहणार आहे. येत्या दिवाळीत विकास कामांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीकरांना दिवाळी भेट देण्यात असल्याचे देखील यावेळी दीपेश म्हात्रे यांनी सांगितले याच दरम्यान या कामाचा शुभारंभ करतेवेळी संबंधित अधिकारी व कंत्राटदार अनुपस्थित राहिल्याने शहर अभियंता यांनी फोन करून संबंधितांना खडे बोल सुनावले