.
केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात डॉक्टर नाहीत. रुग्ण तपासणीची काही यंत्रणा नाही. मुख्यमंत्र्यांनी या रुग्णलयास उपजिल्हा रुग्णालय घोषित करावे. महापालिकेने रुग्णालयात सुरु असलेली आरोग्याची अनास्था दूर करावी नाहीतर आम्ही जन आंदोलन छेडणार असा इशारा देत कल्याणच्या जिल्हा प्रमुख अरविंद मोर यांनी सत्तेत बसलेल्या नेत्यांना घरचा आहेर दिला आहे.
आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती दिनानिमित्त शिवसेना शहर शाखेच्या वतीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात रुग्णाना फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कल्याण जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवि पाटील, माजी नगरसेवक मोहन उगले, सुनिल वायले, महिला पदाधिकारी नेत्रा उगले आदीच्या हस्ते फळांचे वाटप करणयात आले.
या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मोरे यानी रुग्णलायाची पोल खोल केली. आम्ही ज्या रुग्णांना फळे देण्यासाठी आले होते. त्या रुग्णाना योग्य उपचार मिळत नाही. त्यांना उपचारासाठी कळवा आणि मुंबईला पाठविले जाते. या रुग्णलायात तज्ञ डॉक्टर नाही. एमआरआयची सुविधा नाही. प्रसूती गृह येथील वसंत व्हॅली येथे सुरु केले आहे. ते यापूर्वी रुक्मीणीबाई रुग्णालयात होते. आजपासच्या शहरातील महिला प्रसूती येत होते. त्याना ते स्टेशनपासून जवळ असल्याने सोयी चे होते. मात्र आत्ता लांब जावे लागत आहे. काही दिवसापूर्वी एका महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच झाली होती. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो की, या रुग्णालयास उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा. जेणेकरून सुविधा उपलब्ध होतील. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे अन्यथा आम्ही जन आंदोलन उभारु असा इशारा मोरे यांनी प्रशासनाला दिला आहे.