केडीएमसीच्या रुग्णालयास सिवील रुग्णालयाचा दर्जा द्या

Uncategorized

ठाकरे गटाने घेतली आयुक्तांची भेट

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांना सिवील रुग्णाीलयाचा दर्जा द्यावा अशी मागणी
शिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिका आयुक्तांकडे उपस्थित केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख सचिन बासरे, महिला आघाडी प्रमुख विजया पाेटे, सुजाता धारगळकर, माजी नगरसेवक दशरथ तरे, दया सेट्टी, विजय काटकर आदीनी आज महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. कल्याण डोंबिवली महापालिका सोडली तर प्रत्येक महापालिका क्षेत्रात सिवील हा’स्पीटल आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची शास्त्रीनगर आणि रुक्मीणीबाई ही दोन मोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयातून नागरीकांना एक्सरे, सोनोग्राफी, तपासण्यांची सुविधा मिळत नाही. दोन रुग्णालयांपैकी एका रुग्णालयास सिवील रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा. त्यासाठी महापालिकेने पाठपुरावा करावा. याशिवाय शास्त्रीनगर रुग्णालयात क्रेष्णा डायग्नोस्टीकला जागा दिली आहे. त्याठिकाणी जागा महापालिकेची असताना माफक दरात उपचार मिळत नसल्याच्या नागरीकांच्या तक्रारी आहेत.
महापालिकेच्या हद्दीतील अ प्रभाग हा विकासापासून वंचीत आहेत. त्याठिकाणी बड्या बिल्डरांचे गृहसंकुलाचे प्रकल्प सुरु आहेत. मात्र आजही त्या प्रबाग क्षेत्रात रस्ते नीट नाहीत. नागरीकांना मूलभूत सोयी सुविधा मिळत नाहीत. त्या उपलब्ध करुन द्याव्यात.

या विविध समस्यावर आयुक्तांनी तोडगा काढावा अशी मागणी केली. आयुक्तांनी या मागण्यावर सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन ठाकरे गटाच्या शिष्टमंडळास दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *