कल्याण-केडीएमसीच्या ई प्रभाग हद्दीत बेकायदेशीरपणो हातगाडी आणि स्टॅॉल्सवर फटाके विक्री करणा:यांच्या विरोधात महापालिकेच्या अधिका:यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. जे फटाके विक्रेत हटण्यास तयार नव्हते. त्यांच्या फटाक्याच्या हातगाडीवर पाण्याचा फवारा मारण्यात आला. महापालिकेच्या या अनोख्या कारवाई चर्चेचा विषय झाला आहे.
महापालिकेच्या हद्दीतील जवळपास 12 मैदांनावर फटाके विक्री करण्याची परवानगी आणि ना हरकत दाखला अग्नीशमन विभागाने 157 फटाके विक्री करणा:या विक्रेत्यांना दिला आहे. त्यांनी मागितलेल्या परवानगीची पूर्तता अग्नीशमन दलाने केली आहे. कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व पश्चिमेसह पलावा, निळजे नेवाळी परिसरात मोकळ्य़ा जागेवर आणि मैदानात या विक्रेत्यांनी फटाके विक्री करायची आहे. त्याचबरोबर बेकायदेशीरपणे फटाके विक्री करणा:यांच्या विरोधात महापालिकेच्या प्रभाग अधिका:यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे असे अग्नीशमन दलाने प्रभाग अधिका:यांना सूचित केले आहे. महापालिकेच्या हद्दीतील बाजारपेठा, चौक आणि गजबजलेल्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे फटाके विक्री केली जात असल्याचा तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार ई प्रभागातील प्रभाग अधिकारी भारत पवार यांच्या पथकाने पलावा परिसरातील रस्त्यावरील बेकायदेशीरपणे फटाके विक्री करणा:या हातगाडी आाणि स्टॉल्सच्या विरोधात धडाकेबाज कारवाई केली. या कारवाई दरम्यान त्यांनी काही हातगाडय़ा तोडण्याची कारवाई केली तर जे हातगाडी आणि स्टॉल्सधारक कारवाईस जुमानत नव्हते. त्यांच्या गाडीवर आणि स्टॉल्सवर पाण्याचा फवारा मारला.