अस्वच्छ शहर किती सहन करायचे..

Uncategorized

आत्ता तरी आयुक्तांनी अधिका:यांवर कारवाई करावी

मोहन उगले यांची मागणी

घनकरचा प्रकल्पात संथ गतीने काम सुरु असल्याने कचरा वाहक गाडय़ा आठ तास रांगेत उभ्या होत्या. शहरात सर्व ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. कर्मचा:यावर कारवाई करण्यापेक्षा अधिका:यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी केली आहे. आज त्यांनी रिक्षाने प्रवास करीत संपूर्ण शहरात कच:याची काय भयानक परिस्थिती आहे. याचा आढावा घेतला.

काही दिवसापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत प्रमुख मुद्दा होता. शहर स्वच्छ करणो. आयुक्तांनी आश्वासन दिले होते की, स्वच्छतेवर लक्ष दिले जाईल. निष्काळजीपणा करणा:या अधिका:यांवर कारवाई केली जाईल. आयुक्तांचे हे आश्वासन फोल ठरताना दिसून येत आहे आज शिंदे गटाचे नगरसेवक मोहन उगले यानी पत्रकारांना सोबत घेऊन अनेक ठिकाणी पाहणी केली. सर्व ठिकाणी कच:याचे ढिग साचले आहे. महापालिका आधिका:यांकडून सांगितले गेले होते. सकाळी दररोज कचरा उचलला जाईल. असे दिसून आल्यास कामगार आणि अधिका:यांवर कारवाई केली जाईल तसे काही दिसून येत नाही. नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लोक नगरसेवकांकडे तक्रारी करतात. नगरसेवक अधिका:यांकडे तक्रारी करतात. अधिकारी लक्ष देत नाही. याविषया मोहन उगले यांनी सांगितले की, केडीएमसी आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे. कामगारांवर कारवाई करुन काही होणार नाही. थेट अधिका:यांवर कारवाई झाली पाहिजे या सर्व अव्यवस्थेसाठी अधिकारी दोषी आहे. आत्ता आयुक्ता या प्रकरणाची गंभीर दखल घेणार की नाही की हे शहर अस्वच्छच राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *