१२ तास उलटून गेले तरी शवविच्छेदन नाहीहा तर रुक्मीणीबाई रुग्णालयाचा बेजबाबदारपणाच,,

Uncategorized

,

कल्याण

एका व्यक्तीची हत्या झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला. १२ तास उलटून गेले तरी त्याच्या मृतदेहाचे शववि्च्छेदन करण्यात आले नाही. मृतकाच्या कुटुंबियांनी सांगितले की, शवविच्छेदन करायचाचा नव्हता. तर आम्हाला याची कल्पना आधी का दिली नाही. आत्ता मृतदेह जे. जे. रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली आहे. तर रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे की, आमच्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट नसल्याने आम्ही शवविच्छेदन करुन शकत नाही. या प्रकरणात फॉरेन्सिक एक्सपर्ट ची गरज का आहे. त्या व्यक्तिला धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे. या घटनेतून रुग्णालय प्रशासनाचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे.

डोंबिवली परिसरातील आडवली परिसरातील अब्दुल उर्फ वाजीद सय्यद या व्यक्तीची त्याच्या मित्रांनी हत्या केली. मानपाडा पाेलिसांनी आरोपीला ताब्यात घेत वाजीदचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला. रात्री शवविच्छेदन झाले नाही. सकाळीही झाले नाही. दुपारपर्यंत नातेवाईक ताटकळत ह ोते. नातेवाईकांनी जेव्हा रुग्णालयात विचारले की, शवविच्छेदन का केले जात नाही. इतका उशिर का होत आहे. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि एमडी डॉक्टर नसल्याने शवविच्छेदन होऊ शकत नाही असे सांगितले. पोलिसांनाही हेच सांगण्यात आले. अखेर १२ तासानंतर मृतदेह जे जे रु्णालयात घेऊन जाण्याची वेळ मृतकाच्या नातेवाईकांवर आली आहे. कुटुंबीयाचे म्हणणे आहे की, रुग्णालयात एमडी डॉक्टर आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट नव्हता. तसेच एमडी डॉक्टर उपलब्ध नाही. तर आम्हाला याची आधीच कल्पना का दिली गेली नाही. आम्हाला १२ तास ताटखलत का ठेवले. मृतदेह पंख्याखाली उघडा ठेवला आहे. हा बेजबाबदारपणा आहे.

या प्रकरणी डॉक्टर पराग पाडवी यांचे म्हणणे आहे की, आमच्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट नाही. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. अशा प्रकरणात फारेन्सीक एक्सपर्ट लागतो. त्यामुळे शवविच्छेदन झाले नाही. त्याचबरोबर आजपर्यंत डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णलायत शवविच्छेदन कक्ष सुरु झालेला नाही. लोकांचे अजूनही हाल होत आहेत.

खरे पाहता या प्रकरणात फा’रेन्सीक एक्सपर्टची गरज नाही. आरोपी सापडला आहे हत्यारही सापडले आहे. केवनळ टाळाटाळ करण्यासाठी रुग्णलयाकडून शवविच्छेदन केले जात नाही. हा रुग्णलयाचा बेजबाबदारपणा आहे हेच यातून उघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *