Kalyan रेरा प्रकरणात एसआयटीने आत्ता बिल्डरांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. 40 बिल्डरांची बँक खाती गोठविण्यात आली असून खोटी कागदपत्र प्रकरणात तहसीलदार, रजिस्ट्रेशन कार्यालय केडीएमसी आयुक्तांना एसआयटीने पत्र व्यवहार करुन सर्व प्रकारची पूढील प्रक्रिया थांबविण्याची सूचना केली आहे. इतकेच नाही तर सरकारी जागेवर किती ठिकाणी अतिक्रमण झाले आहे यासंदर्भातही माहिती मागितली गेली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात केडीएमसी अधिका:यांच्या खोटी सही शिक्के वापरत अनेक बिल्डरांनी इमारतीच्या परवानग्या मिळविल्या. इतकेच नाही तर त्याच परवागींच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र घेतले. वास्तू विशारद संदीप पाटील यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. या प्रकरणात डोंबिवलीत एकूण 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. याचा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला. ईडीने देखील या प्रकरणाची माहिती संबंधित विभागांकडून मागितली आहे. आत्ता या प्रकरणी एसआयटीने मोठे पाऊल उचलले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आत्तापर्यंत खोटय़ा कागदपत्रंचा वापर करणा:या 40 बिल्डरांची बँक खाती गोठविण्यात आली आहे. खोटे कागदपत्रंच्या आधारे ज्या जमिनींचे व्यवहार झाले आहे. या संदर्भात तहसीलदारांच्या मार्फत जिल्हाधिका:यांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे. या बिल्डरांनी ज्या ग्राहकांना घरे विकली आहे. त्या नागरीकांची फसवणूक होऊ नये यासाठी रजिस्ट्रेशन कार्यालयास सूचित करण्यात आले आहे. नियमित आणि अनियमित इमारतीसंदर्भात केडीएमसी आयुक्तांकडे माहिती मागितली आहे. सरकारी आरक्षित जागेवर काय परिस्थिती आहे. याचा आढावा देखील एसआयटीकडून घेतला जात आहे.