राजकारण बाजूला ठेवून मृत्यू कारण शोधू या
मनसे आमदारांचे पालकमंत्र्यांना पत्रास कारण की
कल्याण-डोंबिवली नजिक संदप गावात असलेल्या खदाणीवर कपडे धुण्यसाठी गेलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेला पाणी टंचाई जबाबदार आहे.या घटने नंतर असे आमदार राजू पाटील यांनी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र पाठवले आहे या भागातील पाणी टंचाईत राजकारण होत आहे. राजकारण बाजूला ठेवून मृत्यू कारण शोध या अशी अशी आर्त हाक मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. या प्रश्नारवर बैठक बोलवा. बैठकीच्या निरोपाची वाट पाहतो असे सांगून त्यांनी पालकमंत्र्यांना हे पत्र पाठविले आहे. त्यांच्या पत्र प्रपंचाची दखल घेऊन पालकमंत्री बैठक बोलविणार का याची वाट आमदार पाटील पाहत आहेत.
देसले पाडय़ात पाणी येत नाही. कपडे धुण्यासाठी गेलेल्या गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा खदानीत बुडून मृत्यू झाला. पालकमंत्री तुम्ही वाहिन्यावर दिसता चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त कदाचित या घटनेची तुम्हाला महिती नसेल. त्यामुळे हा पत्र प्रपंच करीत असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. पाण्यापायी जीव गेला असल्याने तुमचे डोळे नक्कीच पाणावले असतील. त्याच डोळ्य़ातून वास्तवाकडे पहा. पाणी द्या असे उर बडवून ही गावे सांगत असताना आयुक्तांच्या कानावर हा आवाज जात नाही. नागरीकांच्या डोळ्य़ात पाणी आणायचे आणि तेच पाणी पिऊन जगा असे सांगायचे. तहान भागविण्यासाठी आयुक्तांनी केलेली ही योजना नाही ना असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. अजून किती मृत्यूची वाट पाहायची. डोळ्य़ात पाणी येते. पण नळाला पाणी येत नाही. काळजाला पाझर फुटेल असा आयुक्त हवा. यासाठी एक बैठक लावा याकरीता कोणते राजकारण आडवे येते. राजकारण ऐवजी मृत्यूचे कारण शोधा. मी आमदार असलो तरी एक सामान्य नागरीक होऊन हे पत्र पाठवित आहे. लाथ माराल तिथे पाणी काढू शकता. त्यामुळे बघू, पाहू आणि करु हे न करता ताबडतोब कृतीची आपेक्षा आहे. यासाठी बैठक घेऊन निर्णय घ्या बैठकीच्या निरोपाची वाट पाहतो असे पाटील यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे.