कल्याण ग्रामीण
कल्याण ग्रामीणमध्ये अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार असल्याने निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. एका ठिकाणी पाण्याची टाकीचे सेंटरींग कोसळले. तर काटई गावात नव्या पाण्याच्या टाकीचा एक मोठा भाग कोसळला आहे. अमृत योजनेच्या कंत्राटदाराने सत्ताधाऱ्यांना गाड्या घेऊन दिल्या आहेत. हे निकृष्ट दर्जाचे काम पाहून त्यात तथ्य आहे असे दिसते. या प्रकरणी ठेकेदाराच्या विराेधात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार करा अशी सूचना मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे
भाेपर भागात अमृत योजने अंतर्गत पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. आधी पाईप लाईन टाकण्याकरीता रस्ते खोदले गेले. त्या कामात हलगर्जी पणा केला गेला. आत्ता पाण्याची टाकी उभारली जात आहे. ९ लाख लिटर क्षमतेची टाकी बांधली जात आहे. इतके मोठे काम सुरु असताना दोन पाण्याच्या टाक्यांचा भाग कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कामाच्या गुणवत्तेबाबत आधी प्रश्न चिन्ह उपस्थित करणयात आला होता. पाण्याच्या दोन टाक्यांचा भाग कोसळल्या ने काम चांगल्या पद्धतीने केले जात नसल्याची बाब समोर आली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करुन राज्य सरकार हे काम करीत आहे. जीवन प्राधिकरणाच्या वतीने हे काम केले जात आहे. त्यावर महापालिकेची देखरेख आहे. बांधकामात चांगल्या दर्जाचे साहित्य वापरले जात नाही. याची काळजी घेतली जात नाही. या प्रकरणी मनसे आमदार पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे की, याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, भोपर गावात पाण्याची सेंटरींग पडल्याची बातमी कळताच त्याठिकाणी मी चाललो होतो. त्यातच ही माहिती मिळाली की काटई येथेही पाण्याच्या टाकीचा भाग कोसळल्याचे कळले. ठेकेदारांकडून इथल्या सत्ताधाऱ्यांनी कोट्यावधीच्या गाड्या घेतल्या आहे. त्यामुळे ही कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहे. संबंधित कामाच्या गुणवत्ता तपासण्याकरीता व्हीजेटीआयकडून ऑडिट करुन घ्यावे.
महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी शैलेश कुलकर्णी यांनी सांगितले की, टाकीचा स्लॅब कोसळला नसून सेंटरींग कोसळले आहे. या कामाचे व्हीजेटीआयकडून ऑडिट करुन घेतले जाईल.