कल्याण : उद्धव ठाकरे गट अवजड वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश भोर यांचा वाढदिवस त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात थाटात आयोजित करण्यात आला . त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. निलेश यांनी त्यांच्या प्रभागातील च नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या समाजकार्याचा आदर्श आत्मसात करत शिवसेना उपनेते तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी कामे केली आहेत , नागरिकांच्या समस्यांच निराकरण भोर आज पर्यंत करीत आले आहेत. कोरोणा सारख्या भयंकर महामारीत त्यांनी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता आपण समाजासाठी काही देणं लागतो या अनुषंगाने अन्नदान, मच्छर धुरावनी, धान्य किट वाटप तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेता विविध ठिकाणी महाआरोग्य शिबिरे भरवली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच नागरिकांनी प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांना उदंड आयुष्य लाभो असं साई बाबा चरणी साकडं घालण्यात आले. आज पर्यंत निलेश यांनी केलेल्या कामाची पोचपावती पुढील भविष्यात नक्कीच मिळेल यात काही शंकाच नाही असे स्पष्ट प्रतिपादन उपस्थित नागरिकांनी केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा भावी नगरसेवक लिहीलेल्या वाढदिवसाचा केक कापत वाढदिवस साजरा केला . उपनेते अल्ताफ भाई शेख यांच्या शुभहस्ते निलेश यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचं कल्याण पश्चिम पद वाढदिवस भेट म्हणून देण्यात आलं. यावेळी यावेळी माजी महापौर रमेश जाधव ,ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र कपोते, एम एस सी बीचे माजी अधिकारी नागेश घुमरे , नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख संजय उकिरडे, दिलीप तावडे, विलास जैन, सुनील जाधव ,हकीम शेख , साबिर शेख विचारमंच अध्यक्ष मुनाजिर शेख यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .