रेल्वे गुन्हे शाखेची कारवाई

Uncategorized

रेल्वे प्रवासात प्रवाशांचे लॅपटॉप चोरी करणारे दोन सराईत चोरटे गजाआड ,तीन लॅपटॉप हस्तगत

Anchor : – लोकल मध्ये प्रवाशानी रॅकवर ठेवलेले लॅपटॉप चोरी होण्याचं प्रमाण वाढले होते . या गुन्ह्यांचा रेल्वे गुन्हे शाखा समांतर तपास करत होती . याप्रकरणी रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे .मनीष शेंडे उर्फ पिंट्या , अशरफ शेख या दोघांना सापळा रचत अटक केली आहे . हे दोघे सराईत चोरटे असून त्यांच्याकडून पोलिसांनी तीन लॅपटॉप हस्तगत केले आहेत.

व्हिओ : मुंबई उपनगर रेल्वे गाड्यांमधील रॅक वर लॅपटॉप असलेल्या बॅग उचलून चोरी करण्याचे प्रकार वाढले होते.या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रेल्वे गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले .. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशूद्दीन शेख यांच्यासह वडाळा युनिटचे पोलीस उपनिरीक्षक शंकर परदेशी व पोलीस अमलदार यांच्या पथकाने या आरोपींचा शोध सुरू केला. या गुन्ह्यातील आरोपी मनीष शेंडे उर्फ पिंट्या व अशरफ शेख या दोन दोघांना अटक केली . हे दोघं सराईत गुन्हेगार असून या दोघां विरोधात या आधी देखील ठाणे ,कुर्ला,पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. या दोघांकडून पोलिसांनी आतापर्यंत तीन लॅपटॉप हस्तगत केलेत. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *