कल्याण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख व युवक ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांच्या सूचनेनुसार आज कल्याण-डोंबिवली राष्ट्रवादी युवक जिल्ह्याच्या वतीने कल्याण पश्चिमेतील क्षत्रपाती शिवाजी महाराज चौक परिसरात पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ भाववाढीच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर प्रसंगी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चा काढून निषेध नोंदवला
नवनिर्वाचित युवक जिल्हाध्यक्ष राज जोशी व युवक कार्याध्यक्ष विश्वास आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सदर प्रसंगी केंद्र सरकार अशी भाववाढ करून जनसामान्यांवर आर्थिक भार वाढवत आहे. त्यामुळे जनतेचा आक्रोश न बघता दरवाढ कमी करून जनतेची आर्थिक पिळवणूक त्वरित थांबवावी. असे न केल्यास आगामी काळात उग्र स्वरुपाचे आंदोलन हे केंद्र सरकारच्या विरोधात केले जाईल, असा इशारा युवक जिल्हाध्यक्ष राज जोशी यांनी दिला.
यावेळी आंदोलनात कल्याण ग्रामीण अध्यक्ष संतोष जाधव, कार्याध्यक्ष वैभव माळी, सचिन जिल्हा पदाधिकारी सचिन कातकडे, सुनील बोरणाक, गणेश भोईर, वैभव मोरे, कैलास शेंद्रे, सुनील सिंह, नवनाथ गायकर, चंद्रकांत भिसे, संतोष वाढवे, प्रदीप सरोदे, स्वप्निल चौधरी, विकास पारधी, जगन्नाथ माने, सुनील गवळी, फातिमा शेख, प्रवीण तांबे, प्रिया गवस, आकाश लोकरे, सुनीता जाधव, अवधेश शुकला, ओमकार सपकाळ, बाजीराव पेशवे, दीपक दाभणे, नीलेश गोठेकर, विजय कांबळे, दत्ता पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.