सर्व पक्षीय संघर्ष समितीने घेतली आयुक्तांची
कल्याण-संत सावळाराम महाराज स्मारकाच्या जागेसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने नव्याने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी स्वाक्षरी केली असल्याची माहिती २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली आहे.
आज समितीच्या वतीने आयुक्त दांगडे यांची भेट घेण्यात आली. या प्रसंगी समितीचे पदाधिकारी जालिंदर पाटील, गजानन मांगरुळकर, विजय पाटील, शरद पाटील, रंगनाथ ठाकूर, चेतन महाराज, जर्नादन महाराज आदी उपस्थित होते. संत सावळाराम महाराज यांच्या स्मारकाचा विषय मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार स्मारकाच्या उभारणीकरीता जागा निश्चीत केली हाेती. त्यात काही तांत्रिक अडचण आल्याने तो प्रस्ताव बदलून आत्ता पुन्हा कचोरे येथेच नव्याने जागा निश्चीत केली आहे. ही जागा पूर्णपणे स्मारकासाठी आरक्षित असेल. आरक्षित जागेपैकी १० एकर जागा स्मारकाला मिळावी अशी समितीची मागणी आहे.