Raju Patil Archives - Bedhadak Bol Kalyan Live News Portal https://bedhadakbol.com/tag/raju-patil/ Latest News from Kalyan, Thane, Dombivali and Maharashra Wed, 04 Jan 2023 11:41:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत https://bedhadakbol.com/diva-singapore/ https://bedhadakbol.com/diva-singapore/#respond Wed, 04 Jan 2023 11:39:16 +0000 https://bedhadakbol.com/?p=1154 दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला कल्याण ग्रामीण : प्रतिनिधी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नुकताच दिव्यातील एका कार्यक्रमात भाषण केले होते. सध्या याच भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मनसे आमदार राजू पाटील यांनी नरेश म्हस्के यांना टोला हाणत सांगितले की , […]

The post हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला

मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला

कल्याण ग्रामीण : प्रतिनिधी

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नुकताच दिव्यातील एका कार्यक्रमात भाषण केले होते. सध्या याच भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मनसे आमदार राजू पाटील यांनी नरेश म्हस्के यांना टोला हाणत सांगितले की , हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत. दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला आहे.अश्या शब्दात मनसे आमदार राजू पाटील यांनी टोला लगावला आहे.

दिवा शहरात ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के नुकतेच आले होते. यावेळी आपल्या भाषणात दिवा शहराचा विकास आमाचा पक्ष आणि नेते करत आहेत असे म्हस्के ठासून सांगत होते. त्यावेळी आम्हाला पण सिंगापूर बनवायचे आहे,असे वक्तव्य केले आणि याच भाषणाचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. आता यावरूनच मनसे आमदार यांनी टोला हाणत सांगितले की खरं तर खूप हस्यासपद बोलले आहेत ते,माझे मित्र नरेश मस्के ठाणे महानगरपालिकेचे महापौर होते. उपमहापौर दिव्यात राहतात. ८ वर्षात काय दिवे लावले असते ते दिसले असते ना ! सिंगापूर करायच्या हे वार्ता करतात. सिंगापूरला कचऱ्याच्या प्रकल्प मधुन खत बनते, त्याच्यावर गार्डन बनवले आहेत. तर आमच्या दिव्यात हे कचरा आणून टाकत आहेत.हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत. दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला आहे आणि याची ती गँग आहे, ते अजून दिवा ओरबाडत आहेत. त्यामुळे लोकांना गृहीत धरून आम्ही सिंगापूर करू मग मत द्या, हे आता त्यांनी विसरावं लोक काही एवढी मूर्ख राहिली नाहीत, त्यांना यावेळेस दिवेकर जो धडा द्यायचा तो देतील. असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

The post हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/diva-singapore/feed/ 0
मनसे आमदार राजू पाटील यांचे पालकमंत्र्यांना भावनिक पत्र https://bedhadakbol.com/manse-aamdar-raju-patil/ https://bedhadakbol.com/manse-aamdar-raju-patil/#respond Tue, 10 May 2022 12:53:58 +0000 https://sscmrmba.in/newslive/?p=621 राजकारण बाजूला ठेवून मृत्यू कारण शोधू यामनसे आमदारांचे पालकमंत्र्यांना पत्रास कारण की कल्याण-डोंबिवली नजिक संदप गावात असलेल्या खदाणीवर कपडे धुण्यसाठी गेलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेला पाणी टंचाई जबाबदार आहे.या घटने नंतर असे आमदार राजू पाटील यांनी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र पाठवले आहे या भागातील पाणी टंचाईत राजकारण होत आहे. […]

The post मनसे आमदार राजू पाटील यांचे पालकमंत्र्यांना भावनिक पत्र appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
राजकारण बाजूला ठेवून मृत्यू कारण शोधू या
मनसे आमदारांचे पालकमंत्र्यांना पत्रास कारण की

कल्याण-डोंबिवली नजिक संदप गावात असलेल्या खदाणीवर कपडे धुण्यसाठी गेलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेला पाणी टंचाई जबाबदार आहे.या घटने नंतर असे आमदार राजू पाटील यांनी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र पाठवले आहे या भागातील पाणी टंचाईत राजकारण होत आहे. राजकारण बाजूला ठेवून मृत्यू कारण शोध या अशी अशी आर्त हाक मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. या प्रश्नारवर बैठक बोलवा. बैठकीच्या निरोपाची वाट पाहतो असे सांगून त्यांनी पालकमंत्र्यांना हे पत्र पाठविले आहे. त्यांच्या पत्र प्रपंचाची दखल घेऊन पालकमंत्री बैठक बोलविणार का याची वाट आमदार पाटील पाहत आहेत.

देसले पाडय़ात पाणी येत नाही. कपडे धुण्यासाठी गेलेल्या गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा खदानीत बुडून मृत्यू झाला. पालकमंत्री तुम्ही वाहिन्यावर दिसता चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त कदाचित या घटनेची तुम्हाला महिती नसेल. त्यामुळे हा पत्र प्रपंच करीत असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. पाण्यापायी जीव गेला असल्याने तुमचे डोळे नक्कीच पाणावले असतील. त्याच डोळ्य़ातून वास्तवाकडे पहा. पाणी द्या असे उर बडवून ही गावे सांगत असताना आयुक्तांच्या कानावर हा आवाज जात नाही. नागरीकांच्या डोळ्य़ात पाणी आणायचे आणि तेच पाणी पिऊन जगा असे सांगायचे. तहान भागविण्यासाठी आयुक्तांनी केलेली ही योजना नाही ना असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. अजून किती मृत्यूची वाट पाहायची. डोळ्य़ात पाणी येते. पण नळाला पाणी येत नाही. काळजाला पाझर फुटेल असा आयुक्त हवा. यासाठी एक बैठक लावा याकरीता कोणते राजकारण आडवे येते. राजकारण ऐवजी मृत्यूचे कारण शोधा. मी आमदार असलो तरी एक सामान्य नागरीक होऊन हे पत्र पाठवित आहे. लाथ माराल तिथे पाणी काढू शकता. त्यामुळे बघू, पाहू आणि करु हे न करता ताबडतोब कृतीची आपेक्षा आहे. यासाठी बैठक घेऊन निर्णय घ्या बैठकीच्या निरोपाची वाट पाहतो असे पाटील यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे.

The post मनसे आमदार राजू पाटील यांचे पालकमंत्र्यांना भावनिक पत्र appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/manse-aamdar-raju-patil/feed/ 0