राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ठाणे शहर उपाध्यक्षपदी प्रविणा देसाई यांची नियुक्ती
कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रविणा समीर देसाई यांची ठाणे शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. प्रविणा ह्या उच्चशिक्षित असून बीए बीएड झालेल्या आहेत.मुंब्रातील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या संस्थाचालक देखील आहेत.
उच्चशिक्षित राजकीय क्षेत्रात आल्याने ठाण्याच्या राजकारणाला चांगली दिशा मिळेल असे प्रविणा समीर देसाई यांच्या नियुक्ती बाबत बोलले जात आहे.
या बरोबरच तेजस्वी निलेश पाटील यांना ब्लॉक कार्याध्यक्ष कोपरी( महागिरी) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्ती प्रसंगी ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे , राष्ट्रवादी महिला काँग्रेस ठाणे शहर ( जिल्हा) अध्यक्षा वनिताताई गोतपागर , महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष दत्ताभाऊ चव्हाण , महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सचिव सुभाष गायकवाड,जिल्हा सरचिटणीस रविंद्र पालव आणि ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.