मुंबई, 07 मे : दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (dharmveer anand dighe movie) या सिनेमाचा ट्रेलर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. यावेळी सिनेअभिनेता सलमान खान (salaman khan) सुद्धा हजर होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सलमानभाई म्हणत एक प्रश्न विचारला अन् एकच हश्शा पिकली.
दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (dharmveer anand dighe movie) या सिनेमाचा ट्रेलर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाँच झाला. या सोहळ्याला बॉलिवूड सूपरस्टार अभिनेता सलमान खान देखील हजर होता. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
‘काही काही क्षण असे असतात शब्द सुचत नाही. त्या काळामध्ये आपण जातो आणि शब्द सुचत नाही, असं आता माझं झालं आहे. शाल आणि गुच्छ आणि दिला त्यावेळी नाव राखलं आणि निष्ठा राखलं असं वाटलं. सिनेमाचा ट्रेलर पाहिला तेव्हा शिवसेना म्हणजे काय आहे, शिवसैनिक म्हणजे काय आहे, नुसता एक कार्यकर्ता नाही तर गुरू आणि शिक्ष असं हे नातं जपणार हा एकमेव पक्ष असणार आहे. आणि ही भावना असल्यामुळे अनेकांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांना संपवून शिवसैनिक पुढे गेली’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला.