टिटवाळा मधील धक्कादायक प्रकार

Uncategorized

प्रियकराने मित्राच्या मदतीने ३५ वार करत केली प्रेयसीची हत्या

प्रियकर व त्याचा साथीदार गजाआड

Anchor : प्रेमसंबंधातून लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकराने आपल्या एका मित्रासोबत विविहित महिलेची ३५ वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळा येथे उघडकीस आली आहे .मयत महिला रुपांजली जाधव ही पुणे येथे राहत होती.टिटवाळ्यात तिचा मृतदेह आढलुन आल्यानंतर आधार कार्डच्या सहाय्याने तिची पोलिसांनी ओळख पटवली व तिची हत्या करणारा प्रियकर जयराज चौरेसह त्याचा मित्र सूरज धाटे या दोघांना अटक केली ..

टिटवाळा येथील गोवेली परिसरात १२ डिसेंबरला एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेवर धारदार शस्त्राने तब्बल 35 वार करण्यात आले होते. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संदीप शिंगटे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान महिलेजवळ तिच्या आधार कार्ड सापडले होते या आधार कार्डच्या आधारे या मयत महिलेची ओळख पटवली. या मयत महिलेच्या नातेवाईकांना संपर्क साधला.. रुपांजली जाधव असे महिलेचे नाव असून ते पुण्याला राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रुपांजली जाधव ही विवाहित असून तिला तीन मुलं आहेत. दोन वर्षांपासून रुपांजलीचे पुण्यात राहणाऱ्या जयराज चौरे याच्याशी प्रेमसंबंध होते . रुपांजली जयराज कडे लग्नासाठी तगादा लावत जयराजला ब्लॅकमेल करत होती..त्यामुळे जयराज संतापला होता .अखेर जयराज ने रुपंजलीला संपवण्याचा निर्णय घेतला .जयराजने रूपांजलीला दागिने घेऊन देतो असे सांगत तिला टिटवाळ्याला घेऊन आला. टिटवाळा येथील गोवेली परिसरात जयराज व त्याचा मित्र सुरज घाटे यांनी रुपांजलीवर धारदार शस्त्राने वार करत त्याच्या हत्या केली व तेथून पळून गेले. रुपांजली असा काटा काढण्यासाठी त्याने मित्र सोबत तिची हत्या करण्याचा कट रचला होता . यासाठी त्यांनी उल्हासनगर येथून दोन चाकू देखील खरेदी केले होते .अखेर टिटवाळा पोलिसांनी जयराज व त्याचा मित्र सुरज या दोघांना अटक केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *