तुमच्यात हिंमत नाही का एकट्याने बोलण्याची
थेट भाजप आमदारांनाच शाळेच्या उपमुख्याध्यापिकेने दिला दम
उल्हासनगरच्या न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेने यावर्षी ३ पट फी वाढ केल्याने पालक वर्ग चिंतेत आहे.त्यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना याची तक्रार केल्यानंतर आमदार गायकवाड यांनी या शाळेच्या प्रशासनाची भेट घेत त्यांना याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला.
या वेळेत आमदार गायकवाड यांच्या सोबत काही पालक उपस्थित होते,यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिकां यांनी तुमच्या सोबत आलेल्यांना बाहेर पाठवा, तुमच्या एकट्यामध्ये बोलण्याची हिंमत नाही का असा दम चक्क भाजपा आमदारांनाच दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी या उप मुख्याध्यापिकेला चांगलंच धारेवर धरत खडसावलं. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केलं. दरम्यान एका लोकप्रतिनिधींशी शाळा प्रशासन अशा प्रकारे वागत असेल तर पालक वर्गाशी ते कसे बोलत असतील याचा विचार करा असा सवाल आमदार गणपत गायकवाड यांनी उपस्थित केलाय.दरम्यान हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार असून शाळा प्रशासनाने अयोग्य पद्धतीने फी वाढ केल्याचं आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितलं.