बृजभूषण सिंह यांना अटक करत राजीनामा घ्या – युवक काँग्रेस ची मागणी
कल्याण : बृजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपानंतर युवक काँग्रेसच्या वतीने बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलनात्मक पवित्र घेतलाय. कल्याण युवक काँग्रेसच्या वतीने आज भूषण सिंह यांना अटक करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं.
भाजप खासदार व कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.याबाबत काँग्रेस ने आक्रमक पवित्रा घेतलाय.बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आज युवक काँग्रेसने युवक काँग्रेसचे अध्यक्ष जपजीत सिंग प्रदेश सरचिटणीस वीरेन चोरगे यांच्या नेतृत्वात कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठिय्या आंदोलन केलं.. या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळया फीती बांधून भाजप सरकारविरोधात घोषणा करत निषेध नोंदवला. .बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल होऊन चार ते पाच महिने झाले असून अद्याप कारवाई केली नसल्याने बृजभूषण सिंह यांना अटक करून तात्काळ त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी कल्याण युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली .या आंदोलनात युवक काँग्रेसचे कल्याण जिल्हा अध्यक्ष जपजित सिंग, ब्लॉक अध्यक्ष शकील खान, प्रवीण साळवे, युथ काँग्रेसचे विरेन चोरघे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, मुन्ना श्रीवास्तव आदी पदाधिकारी उपस्थित होते .