युवासेना शहर प्रमुख सुजित रोकडे यांचा उपक्रम
कल्याण : कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80%समाज कारण 20% राजकारण या धोरणाचे पालन करून
युवासेना कल्याण पश्चिमच्या वतीने शहर प्रमुख सुजित रोकडे यांच्यावतीने रुक्मिणी बाई हॉस्पीटल मध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. रुग्णांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी, त्यांना लवकर बरं वाटावं. रुग्णांनी दिलेल्या आशीर्वादाने आमदार विश्वनाथ भोईर यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी हे फळ वाटप करण्यात आल्याचे सुजित रोकडे यांनी सांगितले.
त्याप्रसंगी युवासेना भिवंडी विस्तारक सुचेत डामरे, चिटणीस योगेश पाटील, जिल्हा समन्वयक सूरज खानविलकर, विधानसभा समन्वयक किशोर पाटील, शहर प्रमुख सुजित रोकडे, मोहने टिटवाळा शहर प्रमुख दीनेश निकम, विधान सभा सोशल मीडिया प्रमुख चेतन कांबरे, शहर चिटणीस संदीप नहिरे, उपशहर निलेश वाघमारे, उपशहर वैभव पाटील, युवती सेना चिटणीस स्वाती पाटील, उपविभाग प्रमुख सतीश भोसले आणि युवासैनिक उपस्थित होते.