बातमी जी स्पॉट रिपोर्ट दाखवेल!!!
कल्याण पूर्वेतील श्रीमलंगगड रस्त्यावर राजाराम पाटील नगर ,
आडवली गावच्या गेट समोर एका पदाचारीचा रस्त्यावरून जात असताना एनएमएमटी बसच्या मागीलचा चाका खाली येऊन एकाचा जागीच मृत्यू झाला आहे असे स्थानिक फेरीवाले यांच्या काढून सांगण्यात आले ,व्यक्तीचा तोल जात होता ,परंतु तो मद्य पिला होत की ,मनोरुग्ण होता ,याचा तपास पोलीस करत आहेत, मात्र सतत फेरीवाल्यांच्या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी तिथे होत असते खरं पाहिलं तर पादचाऱ्यांना चालण्यासाठी इथे जागा दिसत नाही, मात्र या दुर्दैवी घटनेने फक्त हळहळ व्यक्त केली जात आहे,
जाणाऱ्याचा जीव गेला, फक्त चर्चचा सुरू राहणार का? हा मूळ येथील अनधिकृत उभ्या रिक्षा ,हातगाडी फेरीवाले यांचा विषय बनला आहे…