डोंबिवली महानगरचा घरगुती गॅस डोंबिवलीकरांच्या घरा घरात पोहोचवण्याचे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून २०१५ साला पासून चालू असून यासाठी खासदार कार्यालय प्रमुख .प्रफुल्ल देशमुख हे पाठपुरावा करीत आहेत. डोंबिवली पूर्व भागात मोठ्याप्रमाणावर गॅस पुरवठा चालू करण्यात यश आले असून डोंबिवली पश्चिम भागात जाण्यासाठी सदर गॅसची स्टील लाईन रेल्वे रुळाखालून टाकणे हे जिकरीहे काम होते. परंतु यासाठी लागणारी रेल्वे ची परवानगी . खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे महानगर गॅसला यापूर्वीच मीळाली असून डोंबिवली पूर्वेत गणेश मंदीरा नजीक असलेल्या बागेत खोल खड्डा खणून पिट उभारण्यासाठी कडोंमपा कडून परवानगी मीळण्यात अडसर येत होता. पण पुन्हा एकदा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सुचने नुसार खासदार कार्यालय प्रमुख .प्रफुल्ल देशमुख यांनी संबंधीत खात्यांशी सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला त्यानुसार महानगरपालीकेने गॅस कंपनीला आरआय चार्जेस भरून परवानगी देण्याचे पत्र तयार केले परंतु जिएसटी सारख्या काही तांत्रीक कारणामुळे हे पत्र देण्यात येत नव्हते. म्हणून मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी. आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणी लक्ष घालून सदर परवानगी विनाविलंब देण्याची मागणी केली त्याला यश येउन महानगर गॅस कंपनीला सदर पत्र देण्यात आले असून हि रक्कम पुढील आठवड्यात भरण्याचे अश्वासन महानगर गॅस कंपनीने दिले आहे.
सदर परवानगी मीळाल्या नंतर महानगर गॅस कंपनी रेल्वे रूळा खालून पुश थ्रू पध्दतीने परदेशी ड्रिलींग मशीन मागवून सदर काम चालू करेल व लवकरात लवकर डोंबिवली पश्चिमेतील नागरीकांच्या घरात घरगुती गॅस पुरवठा चालू होइल अशी शुभ चिन्हे दिसू लागली आहेत.