टिटवाळ्य़ा पोलिस ठाण्यात चोरीचे भंगार विकणा:या दोन पोलिसाना निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी या दोन्ही पोलिसांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही पोलिसांनी कल्याण न्यायालयातअतरिम जामीनासाठीअर्ज केला आहे. लवकर यावर सुनावणी होणार आहे. मात्र पोलिसांवर पोलिस ठाण्यातून चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शरद आव्हाड आणि सोमनाथ भांगरेअशी या पोलिस कर्मचार्यांची नावे आहेत.
कल्याण तालुक्यातील टिटवाळा पोलिस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. 25 नोव्हेंबर रोजी टिटवाळा पोलिसांच्या गु्न्हे शाखेने भंगार माफियाच्या विरोधात कारवाई करुन भंगार जप्त केले होते जप्त केलेले भंगार पोलिस कर्मचारी शरद आव्हाड आणि सोमनाथ भांगरे यांनी भंगार माफियांशी संगनमत करुन विकले. हा प्रकार समोर आल्यावर पोलिस विभागात खळबळ उडाली. या दोघांविरोधात निलंबनाची कारवाई केली गेली. या या दोघां सोबत ८ जणांविरोधात विरोधात टिटवाळा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात त्या दोघांची अटक होऊ नये यासाठी दोघांनी कल्याण न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.या प्रकरणात कल्याण न्यायालयात पोलिसांकडून नोंदविला 17 नोव्हेंबरला जवाब नोंदवले जाणार आहे. या दोघांना जामीन मिळणार की नाही याकडे न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.