अमजद खान
सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर शिवसेनेची डोंबिवलीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर शिव मंदिरात महाआरती
: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थिर असल्याचे समजताच राज्यभरात शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आनंद साजरा करण्यात येतोय .डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकरी पंढरीनाथ पाटील यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे राहावेत यासाठी डोंबिवलीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर शिव मंदिरात संकल्प केला होता .न्यायालयाच्या या निकालानंतर आज शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पिंपळेश्वर शिव मंदिरात अभीषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.या महाआरतीला शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते ..
Byte : राजेश मोरे ( डोंबिवली शहर प्रमुख शिवसेना )