खडकपाडा पोलिसांकडून पुढील तपास सुरु
प्रेम प्रसंगातून एका तरुणाला अपहरण करुन त्याला कोंडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. कल्याण ग्रामीणमध्ये असलेल्या देवा ग्रुप हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. तरुणाचे कुटुंब भितीच्या वातावरणात आहे. संपूर्ण कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तरुणावर कल्याणच्या मीरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुलाचे वडिल मोहन जाधव यांचा आरोप आहे की, त्याचा मुलगा कबीर जाधव याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत. आम्ही दोन्ही कुटुंबियांनी बसून मुलीसह मुलाची समजूत काढली होती. परंतू मुलगी ऐकण्यास तयार नव्हती. ती कबीर संर्पकात आहे. आज टिटवाळा परिसरात कबीर त्यांच्या भावासोबत काही लोक फिरत असताना मुलीचा मामा आणि इतर तरुण आले. पाच जणांना अपहरण करुन ते घेऊन गेले. बाकीच्या चार जणांना सोडून टाकले. मात्र कबीर जाधवला बेदम मारहाण केली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने कबीर याचा जीव वाचला आहे. या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलिस करीत आहेत.